काँग्रेस सत्तेत आल्यावरच 'अच्छे दिन' येतील: राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

नवी दिल्ली : सुटी संपवून परत आल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस 2019 साली पुन्हा सत्तेत आल्यानंतरच 'अच्छे दिन' येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : सुटी संपवून परत आल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस 2019 साली पुन्हा सत्तेत आल्यानंतरच 'अच्छे दिन' येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्यावतीने आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे 'जन वेदना संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. राहुल गांधी या संमेलनाचे नेतृत्त्व करत आहेत. यावेळी बोलताना गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. 'मोदींना योगा चांगल्या प्रकारे करता येतो. तुम्ही त्यांना कधी पद्मासन करताना पाहिलेत का? त्याचप्रमाणेच, ज्यावेळी ते हातात झाडू घेऊन भारत स्वच्छ करायला निघतात. त्यावेळी तुम्ही ते झाडू कसा पकडतात हे पाहिले आहे का? तशा पद्धतीने जर झाडू पकडला तर काहीही स्वच्छ होणार नाही', अशी टीका गांधींनी केली.

'नोटाबंदीच्या निर्णयाला अर्थतज्ज्ञ हास्यास्पद निर्णय असल्याचे म्हणत आहेत. भारतीय जनता पक्षाने जे अडीच वर्षात केले आहे, ते आम्ही सात वर्षातही करू शकलो नाहीत. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रत्येक स्वतंत्र संस्था अगदी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, न्यायव्यवस्था कमकुवत केली आहे', असा आरोप गांधी यांनी यावेळी केला. मोदी यांनी 'अच्छे दिना'चे स्वप्न दाखविले. मात्र, ते कधीही पूर्ण होणार नसल्याचा आरोपही त्यांनी केला. "मला भारतातील लोकांना सांगावेसे वाटते की, 2019 साली काँग्रेस ज्यावेळी पुन्हा सत्तेत येईल, त्याचवेळी "अच्छे दिन' येतील', असा आशावादही गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: 'Acche din will only come in 2019 when Congress comes back to power,' says Rahul Gandhi