esakal | ट्रक-मोटारीत भीषण अपघात; नऊ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

accident between truck and scorpio nine killed at uttar pradesh

प्रतापगड जिल्ह्यातील नवाबगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक आणि स्कॉर्पियो यांच्यात आज (शुक्रवार) पहाटे झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

ट्रक-मोटारीत भीषण अपघात; नऊ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

प्रतापगड (उत्तर प्रदेश): प्रतापगड जिल्ह्यातील नवाबगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक आणि स्कॉर्पियो यांच्यात आज (शुक्रवार) पहाटे झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

कोरोनाच्या संकटात सापडली सोन्याची खाण!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त स्कॉ्र्पियोमधील प्रवासी हे बिहारमधील भोजपूर येथून राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. नवाबगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्कॉर्पियोची एका कंटेनर जोरात ट्रकला धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात नऊ जणांचा जागीत मृत्यू झाला. चेंदामेंदा झालेल्या चारचाकीमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस करटचा वापर करावा लागला. या स्कॉर्पियोचा ड्रायव्हर अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातच महिलेवर केला बलात्कार...

अपघातावेळी जोरदार पाऊस सुरू होता. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. शिवाय, जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.