esakal | कोरोनाच्या संकटात सापडली सोन्याची खाण!
sakal

बोलून बातमी शोधा

gold reserves find in east singhbhum jamshedpur at jharkhand

जगभरात कोरोना व्हायरसचे संकट असताना सिंहभूम जिल्ह्यातील भीतरडारीमध्ये 250 किलो सोन्याची खाण सापडली. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 120 कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या संकटात सापडली सोन्याची खाण!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जमशेदपूर (झारखंड): जगभरात कोरोना व्हायरसचे संकट असताना सिंहभूम जिल्ह्यातील भीतरडारीमध्ये 250 किलो सोन्याची खाण सापडली. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 120 कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातच महिलेवर केला बलात्कार...

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाचे उपमहासंचालक जनार्दन प्रसाद आणि संचालक पंकज कुमार सिंह यांनी खाणीत सापडलेल्या सोन्यापासून ते संपूर्ण अहवाल करण्याची जबाबदारी राज्याचे सचिव अबूबकर सिद्दीकी यांच्यावर सोपवली आहे. अहवालातील माहितीनुसार खाणीत 250 किलो सोने आढळून आले आहे. झारखंड सरकारने खाणीत सापडलेल्या लिलावाची तयारी सुरू केली असून, पंकज कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत काम सुरु आहे. या सोन्यामध्ये वेगवेगळ्या गुणवत्तेच्या सोन्याचा समावेश आहे.

ग्रामस्थांनी केले झाडावर क्वारंटाईन...

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणनुसार, झारखंड हे देशातील सोने मिळणारे एक राज्य आहे. यापूर्वी सुद्धा कुंडारकोचा, पहाडी आणि पारासी अशा अनेक ठिकाणी सोने आढळून आले होते. आणखी सात ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडण्याची शक्यता असून, काही दिवसांत शोध घेतला जाणार आहे. रांची ते तामाड दरम्यान सोन्याच्या खाणींचा शोध घेण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. विविध ठिकाणी स्वर्णरेखा नदीच्या वाळूमधून सोन्याचे कण शोधले जात आहेत.

नवरदेव वाजत-गाजत आला नवरीच्या दारात पण...

loading image