esakal | जिल्हाधिकारी कार्यालयातच महिलेवर केला बलात्कार...
sakal

बोलून बातमी शोधा

chhatisgarh collector and ias jk pathak raped a women in office

जिल्हाधिकारी कार्यालयातच जिल्हाधिकाऱयाने बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. शिवाय, अश्लील भाषेत मेसेज, व्हिडिओ पाठवून बोलल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातच महिलेवर केला बलात्कार...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रायपूर (छत्तीसगड) : जिल्हाधिकारी कार्यालयातच जिल्हाधिकाऱयाने बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. शिवाय, अश्लील भाषेत मेसेज, व्हिडिओ पाठवून बोलल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नवरदेव वाजत-गाजत आला नवरीच्या दारात पण...

जंगजीर-छंपा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे. के. पाठक यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दखल केली आहे. तक्रारीमध्ये पीडित महिलेने म्हटले आहे की, 'माझे पती सरकारी कर्मचारी आहेत. शिवाय, मी एका सामाजिक संस्थेत काम करते. सामाजिक संस्थेचे काम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जात होते. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी माझा मोबाईल क्रमांक मिळवला. मोबाईलवर अश्लिल भाषेत मेसेजेस, व्हिडिओ पाठण्यास सुरवात केली. शिवाय, नवऱयाला बढती देण्याचे प्रलोभन दाखवून व संस्थेचे काम करण्यासाठी सतत कार्यालयात बोलावले जात होते. नवऱयाला कामावरून कमी केले जाईल, अशी धमकीही दिली जात होती. कामानिमित्तानं पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेली असताना कार्यालयातच बलात्कार करण्यात आला. ही घटना 15 मे रोजी घडली आहे. याबाबतचे सर्व पुरावे आहेत.'

ग्रामस्थांनी केले झाडावर क्वारंटाईन...

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पीडित महिलेने पोलिसांन फोनमधील सर्व मेसेज आणि व्हिडिओही दाखवले आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

loading image