धुक्‍यामुळे अपघातात 7 जण ठार; 14 जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 25 डिसेंबर 2016

लखनौ : उत्तर प्रदेशमधील भदोही आणि मऊ जिल्ह्यांमध्ये दाट धुक्‍यामुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत 7 लोकांचा मृत्यू झाला, तर अन्य 14 जण गंभीर जखमी झाले.

लखनौ : उत्तर प्रदेशमधील भदोही आणि मऊ जिल्ह्यांमध्ये दाट धुक्‍यामुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत 7 लोकांचा मृत्यू झाला, तर अन्य 14 जण गंभीर जखमी झाले.

भदोहीहून पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने व्हॅनला दिलेल्या धडकेत एका पाच वर्षीय मुलासह तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. अन्य दोन घटनांत एका तरुणाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. मऊ जिल्ह्यात जीपला बसने दिलेल्या धडकेत दोन वृद्ध ठार झाले, तर अन्य सात जण जखमी झाले.

Web Title: accident due to dew