लग्नाचे वऱ्हाड नेणाऱ्या जीपला अपघात; पाच ठार

पीटीआय
शनिवार, 28 एप्रिल 2018

लग्नाचे हे वऱ्हाड गुणा जिल्ह्यातील बिनख्यायी गावातून जीपने परत चालले होते त्या वेळी त्याची ट्रकशी धडक झाली. या अपघातात पाच जण ठार झाले त्यात एका नववधूचा समावेश आहे, असे छांनछोडा पोलिस ठाण्याचे प्रमुख प्रवीण चौहान यांनी सांगितले.

गुणा (मध्य प्रदेश) : गुणा जिल्ह्यातील लाहरचा गावात झालेल्या ट्रक आणि जीप अपघातात पाच जण ठार झाले तर अन्य तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये एका नववधूचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. आग्रा-मुंबई महामार्गावर आज सकाळी हा अपघात झाला. लग्नसमारंभातील हे वऱ्हाड राजगड जिल्ह्यातील तलेन गावात परत चालले होते, असे पोलिसांनी सांगितले. 

लग्नाचे हे वऱ्हाड गुणा जिल्ह्यातील बिनख्यायी गावातून जीपने परत चालले होते त्या वेळी त्याची ट्रकशी धडक झाली. या अपघातात पाच जण ठार झाले त्यात एका नववधूचा समावेश आहे, असे छांनछोडा पोलिस ठाण्याचे प्रमुख प्रवीण चौहान यांनी सांगितले.

अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. त्यात नववधू भूरीबाई (वय 21), काजल लोढा (वय 14), गजराज लोढा (वय 49), गोपाळ (वय 45) आणि कैलास (वय 50) यांचा समावेश आहे. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्त ट्रक जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Accident marriage Family jeep accident 5 dead