कर्नाटकात भीषण अपघात; ७ जण जागीच ठार, २६ जण जखमी

अपघाताताली जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
accident
accidentANI
Summary

अपघाताताली जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. हुबळी-धारवाडच्या तरीहाळा (Tarihal bypass) बायपासवर (Hubballi Dharwad Bypass) भीषण अपघात झाला आहे. यात लॉरी आणि खासगी बसची समोरासमोर जोरादार धडक झाली आहे. या अपघातात ७ जण जागीच ठार झाले असून २६ जण जखमी झाले आहेत. अपघाताताली जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये कर्नाटकातील दोघांचा समावेश आहे, तर ६ जण कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील होते. अपघातातील जखमींवर हुबळीच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

accident
'भाजप एक गमतीशीर पक्ष, कोणत्या गोष्टीचा इव्हेंट करतील भरवसा नाही'

मिळालेल्या माहितीनुसार एक खाजगी प्रवासी बस ही कोल्हापूरहून बंगळूरकडे निघाली होती. याच प्रवासी बसची आणि एका लॉरीची आमने-सामने जोरदार धडक झाली. मध्यरात्री साडेबारा ते एक दरम्यान हा भीषण अपघात घडला आहे. बसचा ड्रायव्हर एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या अपघाताबाबत एफआयआर नोंदवली असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे हुबळी परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे. हा अपघात इतका भीषण झाला आहे की बसचा समोरील भागाचा पूर्णत: चक्काचूर झाला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच धारवाडमध्येही अपघाताची घटना घडली होती. यात ७ जण ठार झाले होते. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एका या अपघाताच्या धक्कादायक घटनेनं हुबळीकर हळहळ व्यक्त करत आहे. लग्नकार्य उरकुन परतत असताना धारवाडमधील अपघतात सात जणांना जीवाला मुकावे लागले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com