
झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील मोहनपूर ब्लॉकमधील जमुनियाजवळ मंगळवारी पहाटे भाविकांची बस आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात बस चालकासह 19 भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर 12 जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचले. सर्व मृत आणि जखमींना सदर रुग्णालयात नेण्यात येत आहे.