चारधाम यात्रेसाठी निघालेल्या गाडीत सिलिंडरचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू

Accidental death of six passengers in Chardham Yatra
Accidental death of six passengers in Chardham YatraAccidental death of six passengers in Chardham Yatra

उत्तराखंडमध्ये बुधवारी (ता. २५) चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या सहा प्रवाशांचा अपघाती मृत्यू (Accidental death) झाला. टिहरी जिल्ह्याजवळ हा अपघात झाला. प्रवाशांनी स्वयंपाकासाठी गाडीत गॅस सिलिंडर ठेवला होता. सिलिंडरमध्ये स्फोट झाल्याने हा अपघात झाला, अशी माहिती टिहरीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातात प्राण गमावलेले सर्व प्रवासी हे पश्चिम बंगालचे असल्याचे सांगण्यात येत आहे. (Accidental death of six passengers in Chardham Yatra)

प्राप्त माहितीनुसार, अंकित कुमार, हयात सिंग, मेहेरबान सिंग, दबडे, अंबिका आणि कुमारी मोनिका अशी मृतांची (Accidental death) नावे आहेत. जखमींना पबळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून दोन गंभीर जखमींना पौरी येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. सर्व प्रवासी कारने चारधाम यात्रेसाठी निघाले होते. प्रवाशांनी स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरही (cylinder) सोबत घेतला होता.

Accidental death of six passengers in Chardham Yatra
राहुल गांधींचा लंडन दौरा वादात; परवानगी न घेतल्याची सूत्रांची माहिती

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी आरडाओरड झाली. यानंतर घटनेची माहिती लोकांनी तातडीने पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहांना वाहनातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. तसेच जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.

अलीकडेच २६ एप्रिल रोजी उत्तराखंडमधील पौडी येथे भीषण अपघात (Road Accident) झाला होता. येथे पिकअप वाहन खोल दरीत कोसळले होते. या अपघातात सहा जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले होते. हे सर्व लोक एका लग्न समारंभात सहभागी होऊन परतत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com