स्वातंत्र्य दिवसानंतर तिरंगा इकडे तिकडे फेकू नका, होऊ शकते ३ वर्षांची शिक्षा; वाचा नियम

स्वातंत्र्य दिवस संपल्यानंतर तिरंगा तुम्ही जरा का इकडे तिकडे टाकला किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर तुम्हाला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
flag code of india on indepedence day know how to safely keep the tricolor and laws
flag code of india on indepedence day know how to safely keep the tricolor and lawsesakal

स्वातंत्र्य दिवसाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी त्यांच्या घरावर तिरंगा फडकवला आहे. भारतात हर घर तिरंगा अभियानानंतर तर प्रत्येक दुसऱ्या घरी यंदा तिरंगा फडकवण्यात आलाय. मात्र स्वातंत्र्य दिवस संपल्यानंतर हा तिरंगा तुम्ही जरा का इकडे तिकडे टाकला किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. राष्ट्रध्वज खाली पडला किंवा त्यांचा संपर्क जमिनीशी किंवा पाण्याशी आला की तिरंग्याचा अपमान होतो अशावेळी झेंड्याचा अपमान होऊ नये याची काळजी घेणे फार महत्वाचे ठरते. अन्यथा तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. (flag code of india on indepedence day know how to safely keep the tricolor and laws)

स्वातंत्र्यदिनानंतर तिरंग्याचं काय करावं ?

देशात कागदी झेंड्यांचं चलन फार जास्त आहे. मात्र अनेकजण हे झेंडे दुसऱ्या दिवशी फेकून देतात किंवा इकडे तिकडे पडून असतात. याने राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होतो. तिरंग्याचा वापर केल्यानंतर त्याला योग्य प्रकारे एकांतात ठेवणे महत्वाचे असते. फ्लॅग कोडनुसार तिरंग्याचा संपर्क जमिनीशी किंवा पाण्याशी येता कामा नये. तिरंगा फाटल्यास किंवा खराब झाल्यास त्याला एकांतात जाळावे.

flag code of india on indepedence day know how to safely keep the tricolor and laws
Independence Day : बॉलिवुडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आर्मी ऑफिसर्सच्या मुली

तिरंग्याचा अपमान केल्यास 'ही' शिक्षा

कुठलाही व्यक्ती राष्ट्रध्वजाचा अपमान करत त्यास जाळत असेल किंवा घाण करत असेल किंवा तुडवत असेल तर त्याला नियमात निश्चितच शिक्षेची तरतूद आहे. नियमाविरूद्ध ध्वजारोहण केल्यास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्या व्यक्तिस शिक्षा आणि दंड दोन्ही होऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com