esakal | पतांजलीचे आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती खालावली, एम्समध्ये दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Acharya Balkrishna admitted in the Aiims

आचार्य बालकृष्ण कोणालाही ओळखू शकत नाहीत. तसेच, काही बोलण्याच्या स्थितीतही ते नाहीत. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे "एम्स'चे वैद्यकीय अधीक्षक प्रा. ब्रह्म प्रकाश यांनी सांगितले.

पतांजलीचे आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती खालावली, एम्समध्ये दाखल

sakal_logo
By
पीटीआय

हरिद्वार : पतंजली योगपीठाचे महामंत्री आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती शुक्रवारी सायंकाळी अचानक बिघडली. त्यांनी हृषीकेशमधील "एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

आचार्य बालकृष्ण कोणालाही ओळखू शकत नाहीत. तसेच, काही बोलण्याच्या स्थितीतही ते नाहीत. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे "एम्स'चे वैद्यकीय अधीक्षक प्रा. ब्रह्म प्रकाश यांनी सांगितले. बालकृष्ण यांना सध्या अतिदक्षता विभागात 24 तासांसाठी निरीक्षणाखाली ठेवले आहे. त्यांचे "एमआरआय' आणि अन्य चाचण्यांचे अहवाल सामान्य आले आहेत. खाण्यातून विषबाधा झाल्याने त्यांची तब्बेत बिघडली असण्याची शक्‍यता डॉ. प्रकाश यांनी व्यक्त केली. योगगुरू रामदेव बाबा रुग्णालयात उपस्थित आहेत. 

loading image
go to top