acid attack

acid attack

esakal

Delhi Acid Attack : राजधानी दिल्लीत संतापजनक घटना! महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर भररस्त्यात ‘अ‍ॅसिड’ हल्ला

acid attack on college student : हल्लेखोर तरूण अनेक दिवासांपासून करत होता पाठलाग; दिल्लीत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
Published on

Shocking Acid Attack in Delhi College Student Targeted : दिल्लीतील मुकुंदपूरमध्ये एक भयानक घटना घडली. या घटनेमुळे राष्ट्रीय राजधानीतील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या ठिकाणी एका २० वर्षीय विद्यार्थीनीवर चक्क अ‍ॅसिड हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत संबंधित मुलगी गंभीर भाजली गेली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अ‍ॅसिडमुळे भाजल्या गेल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेने सांगितले की, ती कॉलेजला जात असताना मुकुंदपूर येथील जितेंद्र त्याचे मित्र इशान आणि अरमानसह मोटारसायकलवरून आला. इशानने अरमानला बाटली दिली आणि त्याने तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. दरम्यान तिने चेहरा वाचवण्याचा प्रयत्न करताना तिच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आणि त्यांचा कसून शोध सुरू आहे. पीडितेने असेही म्हटले आहे की जितेंद्र तिचा कायम पाठलाग करत होता आणि सुमारे एक महिन्यापूर्वी त्यांच्यात जोरदार वाद झाला होता.

acid attack
Cyclone Monthha : चक्रीवादळ ‘मोंथा’ धडकणार! ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा; लष्करी तुकड्याही 'अलर्ट मोड'वर

 पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली आहे. तिच्या वक्तव्याच्या आणि जखमांच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकऱणी पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com