Cyclone Monthha : चक्रीवादळ ‘मोंथा’ धडकणार! ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा; लष्करी तुकड्याही 'अलर्ट मोड'वर

Cyclone Montha Alert : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द ; जाणून घ्या, कोणत्या राज्यांना बसणार आहे फटका?
Cyclone Monthha

Cyclone Monthha

esakal

Updated on

India Weather Warning Army on High Alert :बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र रविवारी आणखी अधिक तीव्र दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले. आता ते हळूहळू पूर्व किनाऱ्याकडे सरकत आहे, त्यामुळे ओडिशा सरकारने सर्व ३० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, पश्चिम बंगाललाही या वादळाचा फटका बसणार आहे. याशिवाय, चक्रीवादळ मोंथा येण्याच्या शक्यतेने आंध्र प्रदेश सरकारने मदत आणि आवश्यक पुरवठ्यासाठी कृती योजना तयार केली आहे. एवढंच नाहीतर लष्कराच्या तुकड्या देखील सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.

भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले की, चक्रीवादळ मंगळवारी संध्याकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडाजवळ ताशी ११० किलोमीटरपर्यंतचा प्रचंड हवेची गती असणाऱ्या चक्रीवादळाच्या रूपात जाण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने हेही म्हटले आहे की, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी ओडिशामध्ये खूप मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडेल.

रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी -

आयएमडीने ओडिशामधील अनेक दक्षिणी आणि समुद्रकिनारा असणाऱ्या जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. ओडेशात काही ठिकाणी २० सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

Cyclone Monthha
Plane Crash Explosion Video : भयानक विमान दुर्घटना! उड्डाण घेताच मोठा स्फोट अन् क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतर

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द –

ओडिशा सरकारच्या एक मंत्र्यांनी माहिती दिली आहे की, प्रचंड पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना या संभाव्य भागांमधून नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच आदेश दिले आहेत. याशिवाय, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

Cyclone Monthha
flight caught fire mid-air VIDEO : उडत्या विमानात अचानक भडकली आग; प्रवाशांची आरडाओरड अन् पळापळ...

लष्करासोबतच NDMA टीम अलर्टवर -

प्रचंड वेगाने पुढे सरकत असणारे चक्रीवादळ मोंथा पाहता, भारतीय लष्कराला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. याशिवाय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA आणि संबंधित राज्य सरकारसोबत मिळून परिस्थितीवर बारकाई लक्ष ठेवले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com