विवाहीत महिलेचा प्रेम प्रस्ताव नकारला; प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news
विवाहीत महिलेचा प्रेम प्रस्ताव नकारला; प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला

विवाहीत महिलेचा प्रेम प्रस्ताव नकारला; प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला

अनैतिक प्रेम संबंधांतून होणाऱ्या वेगवेळ्या घटना आणि गुन्हे रोज आपल्यासमोर येतात. त्यातच एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, दोन मुलांची आई असलेल्या ३५ वर्षीय महिलेला शनिवारी लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीवर अॅसिड फेकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, तिरुवनंतपुरम येथील अरुण कुमार (२८) यांच्यावर शहरातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शीबा नावाच्या या महिलेने १६ नोव्हेंबर रोजी अरुण कुमार यांच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. त्यातून त्यांना दृष्टी गमावण्याचा धोका आहे.

हेही वाचा: आदर्श पती-पत्नीच्या नात्यातील 'या' आहेत पाच गोष्टी

डॉक्टरांचे म्हणणे आहे की पिडीताची दृष्टी जाण्याची दाट शक्यता आहे. शीबा आणि अरुण कुमार यांची फेसबुकच्या माध्यमातून भेट झाली होती. नंतर अरुण कुमारला कळले की शीबा विवाहित आहे आणि दोन मुलांची आई आहे. त्यामुळे त्याला हे नातं संपवायचं होतं, पण शीबाने त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि पैशांची मागणी केली.

loading image
go to top