पणजीत प्लॅस्टिक पिशव्याविरूद्ध कारवाई

विलास ओहाळ
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

अनेकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा लपविला होता. सकाळच्या सत्रात दहा विक्रेत्यांना ५ हजार रूपये प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे .

पणजी : सलग तीन सुट्यांमुळे लांबलेली प्लॅस्टिक पिशव्या देणाऱ्या दुकानदारांविरुद्धच्या कारवाईला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली. 

महापालिकेच्या पथकाने सकाळी मासळी, मटण मार्केटमध्ये कारवाई केली. सकाळच्या सत्रात झालेल्या या धडक कारवाईमुळे दुफानदारांची पळापळ सुरु झाली.

अनेकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा लपविला होता. सकाळच्या सत्रात दहा विक्रेत्यांना ५ हजार रूपये प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे .

Web Title: Action against Plastic Bags in Panaji

टॅग्स