मोदी कारवाईवेळी 'अॅक्शन रुम'मध्ये होते हजर

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अॅक्शन रुममध्ये हजर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आल्याने जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रुम उद्ध्वस्त झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज (मंगळवार) 12 दिवस होत असतानाच भारताने या घटनेचा बदला घेतला.

भारताने आज पहाटे साडेतीनच्या सुमारास 12 मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. या कारवाईत अनेक अतिरेकी आणि जैशचे कमांडर ठार झाले आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली आहे. भारताने केलेल्या कारवाईवेळी मोदी अॅक्शन रुममध्ये हजर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या या हवाईहल्ल्यात 350 दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये 325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा केला आहे. यामध्ये जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com