गोवा दारू रोखण्यासाठी 'अ‍ॅक्शन प्लॅन' ; पाच नवी विभागीय तपासणी नाके

Action Plan to prevent Goas alcohol Five new departmental check boards
Action Plan to prevent Goas alcohol Five new departmental check boards

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात येणार्‍या गोवा बनावटीच्या दारूची आयात रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन तपासणी नाक्यासह विभागीय स्तरावरील पाच नवीन नाके उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी कोल्हापूर, सातारा, सांगली येथील कर्मचारी वर्ग मागविण्यात आला आहे. 

कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून लाखो चाकरमानी येथे दाखल होतात. मद्याच्या विक्रीचा उच्चांक या काळातच होतो. गोवा बनावटीची मद्याची राज्याच आयात होते. परिणामी शासनाचा महसूल ढासळतो. याला पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाचे शिरगाव (चिपळूण), कशेळी आणि पाली हे तीन तपासणी नाकी आहेत. गोवा बनावटीचे मद्य छुप्या मार्गाने राज्यात येते. ते रोखण्यासाठी आंबा घाट, आंबोली घाट, दोड्डामार्ग, करूळ घाट, फोंडाघाट, दानोली, खारेपाटण येथे नवीन चेकपोस्ट उभारण्यात येणार आहेत. 

...तर परवाने रद्द करू

गणेशोत्सवाच्या काळातील ड्राय डेला मद्याची दुकाने उघडी ठेवलेली आढळल्यास तत्काळ परवाना रद्द करण्यात येणार आहे. तसेच दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळा न पाळल्यासही कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक दुकानापुढे वेळा डिस्प्ले केल्या जाणार आहेत. त्यामध्ये बिअरशॉपी, वाईन शॉप सकाळी 10 ते रात्री 10.30 वा., परमिटरूम सकाळी 11.30 ते रात्री 11.30 वा., देशीदारू सकाळी 10 ते रात्री 10 अशा वेळा निश्‍चित केल्या आहेत. 

देशीदारू दुकान - 47
परमिटरूम संख्या - 141
वाईन शॉपी - 11
बिअरशॉपी - 65

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com