
Maharashtra Vs Karnataka : स्थानिक मराठी वृत्तपत्रांकडून कन्नडविरोधात लिखाण केले जात आहे. राज्यामध्ये राहून सरकारचे अनुदान मिळवणाऱ्या वृत्तपत्रांकडून राज्यभाषेविरोधात भूमिका घेतलेली खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे अशा वृत्तपत्रांवर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, असे कन्नड विकास प्राधिकराचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिळीमले यांनी सांगितले.