esakal | देशातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट; आरोग्य मंत्रालयाची माहिती

बोलून बातमी शोधा

देशातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट; आरोग्य मंत्रालयाची माहिती
देशातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट; आरोग्य मंत्रालयाची माहिती
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या चिंतेचं वातावरण आहे. तसेच दररोज जवळपास अडीच लाखांहून अधिक रुग्ण कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचं चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांमध्ये दोन हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास तीन लाख लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुडवडा आहे तसेच रेमडेसिव्हीर औषधासाठी देखील मोठी मागणी आहे. सध्या देशातील कोरोनाविरोधातील लढा मोठा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये सध्या कडक नियम तसेच काही ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे तर एअर इंडियाने देखील 24 ते 30 एप्रिलच्या दरम्यान भारत आणि ब्रिटनच्या दरम्यान सगळ्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत.

भारतात सध्या 21,57,000 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. गेल्या वर्षी सर्वाधिक ऍक्टीव्ह रुग्ण असणाऱ्या संख्येपेक्षा हा आकडा दुप्पट आहे. आतापर्यंत देशातील 13 कोटी लोकांना लस दिली गेली आहे. 30 लाख डोस गेल्या 24 तासांमध्ये देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी दिली आहे. राजेश भूषण यांनी म्हटलंय की, भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्रांवर लस मोफत उपलब्ध करुन दिली जाईल. या केंद्रांवरील वयाची मर्यादा 45 वर्षे राहिल. यामध्ये आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर्स देखील सामील असतील.

हेही वाचा: 'हृदयद्रावक'; नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...

हेही वाचा: नाशिक जिल्‍हा हादरला; कोरोनामुळे मृतांच्‍या संख्येने यापूर्वीचे सर्व उच्चांक मंगळवारी मोडून काढले

गेल्या वर्षी सरासरी सर्वाधिक दैंनदिन रुग्ण हे 94,000 च्या आसपास सापडले होते. मात्र यावर्षी फक्त 24 तासांत सर्वाधिक म्हणजे गेल्या 24 तासांत 2,95,000 रुग्णांची नोंद झाली आहे. पुढे त्यांनी अशीही माहिती दिली की, 308 जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोना संसर्ग आटोक्यात आहे. तर देशात 146 जिल्हे असे आहेत, ज्याठिकाणी पॉझीटीव्हीटी रेट हा 15 टक्क्यांहून अधिक आहे. ढे त्यांनी अशीही माहिती दिली आहे की, आतापर्यंत जवळपास 87 टक्के आरोग्य कर्मचारी आणि 79 टक्के फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.