केवळ एका ट्विटमुळं शेहला रशिदवर देशद्रोहाचा गुन्हा

टीम ई-सकाळ
Friday, 6 September 2019

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी चळवळीतील विद्यार्थी आणि वाद काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांत शेहला रशिद हे नाव त्याच वादातून प्रसिद्धीच्या झोतात आलंय. शेहला रशिदला आता तिचे ट्विट महागात पडले आहे. त्या ट्विटवरून तिच्यावर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी चळवळीतील विद्यार्थी आणि वाद काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांत शेहला रशिद हे नाव त्याच वादातून प्रसिद्धीच्या झोतात आलंय. शेहला रशिदला आता तिचे ट्विट महागात पडले आहे. त्या ट्विटवरून तिच्यावर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय.

गडकिल्ल्यांवर हॉटेल यावर खासदार संभाजीराजे म्हणाले...

काय आहे शेहला रशिदचा आरोप?
सुरक्षा दलांवर आरोप करणारे ट्‌विट केल्याप्रकरणी जम्मू आणि काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट पक्षाच्या नेत्या शेहला रशिद यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रशीद या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या (जेएनयूएसयू) माजी उपाध्यक्षा आहेत. जम्मू आणि काश्‍मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा हटविल्यानंतर सुरक्षा दलांकडून राज्यातील जनतेचा छळ केला जात असून, नागरिकांची घरे उद्‌ध्वस्त केली जात असल्याचा आरोप रशिद यांनी ट्‌विटच्या माध्यमातून केला होता. खोटी बातमी पसरवून भारतीय लष्कराची प्रतिमा मलिन केल्याचा आरोपही रशिद यांच्या विरोधात ठेवण्यात आला आहे. 17 ऑगस्ट रोजी रशिद यांनी एकापाठोपाठ ट्‌विट केले होते. रशिद यांच्या ट्‌विटला आक्षेप घेत त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातील वकील अलख अलोक श्रीवास्तव यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांच्या विशेष विभागाकडून 3 सप्टेंबर रोजी रशिद यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

भुजबळांनी दिला सर्व चर्चांना पूर्णविराम

कोण आहे शेहला रशिद?
शेहला रशिद ही जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पीएचडी स्टुडंट आहे. शेहला ही ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनची सदस्य होती. देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरून कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांना अटक झाली होती. त्यावेळी या अटकेच्या विरोधात शेहला रशिदने आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्या आंदोलनातूनच शेहला प्रसिद्धीच्या झोतात आली. सध्या शेहला पीएचडी करत असली तरी, तिने या वर्षी मार्च महिन्यात जम्मू-काश्मीर पिपल्स मुव्हमेंट या पक्षात प्रवेश केला आहे. माजी आयएएस अधिकारी शाह फैझल यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतरच शेहलाने काश्मीरमधील परिस्थितीवर भाष्य करणारे ट्विट केले होते. परिणामी तिच्यावर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Activist Shehla Rashid booked on sedition charges after tweet against security forces