अभिनेता प्रभासने करून घेतलं सेल्फ क्वारंटाईन, कारण...

वृत्तसंस्था
रविवार, 22 मार्च 2020

प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मॅसेज टाकत स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करत असल्याचे सांगितले आहे. प्रभासने म्हटले आहे, की मी परदेशातुन शुटींग पूर्ण करून मायदेशी परतलो आहे.

चेन्नई : देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. यात आता अभिनेता प्रभासचाही समावेश झाला असून, त्याने स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. CoronaVirus

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas) on

प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मॅसेज टाकत स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करत असल्याचे सांगितले आहे. प्रभासने म्हटले आहे, की मी परदेशातुन शुटींग पूर्ण करून मायदेशी परतलो आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मी सेल्फ क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे, की आपण सर्वजण सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेत असाल.

बाहुबली फेम अशी ओळख असलेला प्रभास जॉर्जियाहून शुटींग पूर्ण करून आला आहे. दिग्दर्शक राधाकृष्ण कुमार यांच्या नव्या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. परदेशातून परतल्यानंतर अनुपम खेर, शबाना आझमी या अभिनेत्यांनीही सेल्फ क्वारंटाईन करून घेतलेले आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, नागरिकांकडून काळजी घेण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor Prabhas in Self-quarantine After Returning from Film Shoot