'मोदी-शहा तुम्ही आम्हाला ठार मारणार आहात का?'

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

डियर पंतप्रधान, बेरोजगारांची वाढती संख्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षणापासून वंचित असलेली मुले, गरिब या सर्व गोष्टींना तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे.

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तुमचे सत्ता चालविण्याचे तंत्र हे ठोकशाहीचेच आहे. तुम्ही सर्व नागरिकांना असेच वागविणार आहात का? तुम्ही आम्हा सर्वांना मारून टाकणार आहात का, असे गंभीर प्रश्न दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी उपस्थित केले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरात सीएए आणि एनआरसी या कायद्यांवरून हिंसाचार सुरु आहे. अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेल्या या कायद्याविरोधात देशभरात प्रमुख शहरात आंदोलन करण्यात आली आहेत. पोलिसांकडून अनेक ठिकाणी लाठीमार करण्यात आला आहे. दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातही विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला होता. याचे पडसाद देशभर उमटले होते. मोदी सरकारविरोधात कायम भूमिका घेणाऱ्या प्रकाश राज यांनी पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईसंदर्भात व्हिडिओ शेअर करून या कायद्यांना विरोध केला आहे. #IndiaAgainstCAA_NRC असा हॅशटॅगसह त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

'जे शत्रूला जमलं नाही ते मोदी करतायत'

प्रकाश राज यांनी याबाबत 21 डिसेंबरलाही ट्विट करत म्हटले होते, की डियर पंतप्रधान, बेरोजगारांची वाढती संख्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षणापासून वंचित असलेली मुले, गरिब या सर्व गोष्टींना तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे. संविधानाला संपविण्यापूर्वी तुम्ही किती जणांचा जीव घेणार आहात? आम्ही तुम्हाला घाबरतोय.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Prakash Raj slammed PM Narendra Modi and Amit Shah