प्रकाश राज यांच्या हत्येचा रचण्यात आला होता कट

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीकडून परशुराम आणि त्याच्या इतर साथीदारांची चौकशी सुरू असून, या चौकशीदरम्यान लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी अभिनेते प्रकाश राज यांच्या हत्येचा कट आखल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. 

बंगळुरु : अभिनेते प्रकाश राज यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे समोर आले. प्रकाश राज हे पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या निशाणाऱ्यावर होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली. प्रकाश राज यांच्या हत्येचा कट लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी आखला होता, अशी माहिती कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिली.

पत्रकार लंकेश यांची हत्या केल्याची कबुली हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित परशुराम वाघमारेने दिली. याप्रकरणी वाघमारेसह आणखी काही जणांना अटक करण्यात आली. कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीकडून परशुराम आणि त्याच्या इतर साथीदारांची चौकशी सुरू असून, या चौकशीदरम्यान लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी प्रकाश राज यांच्या हत्येचा कट आखल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. 

दरम्यान, प्रकाश राज यांनी कडव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी संघटनांवर टीकास्त्र सोडले होते. प्रकाश राज यांच्या याच टीकेमुळे त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला.

Web Title: actor prakash raj was also a target of gauri killers reveals sit