प्रसिद्ध गायिका रुमा गुहा ठाकुरता यांचे निधन 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जून 2019

अभिनेत्री, गायिका रुमा गुहा ठाकुरता (वय 84) यांचे आज राहत्या घरी झोपेतेच निधन झाले. त्या अनेक आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या कुटुंबात गायक अमित कुमारसह दोन मुले, एक मुलगी आहेत. रुमा गुहा यांनी दोन विवाह केले होते. चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांची पुतणी रुमा यांनी 60 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. 

कोलकता: अभिनेत्री, गायिका रुमा गुहा ठाकुरता (वय 84) यांचे आज राहत्या घरी झोपेतेच निधन झाले. त्या अनेक आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या कुटुंबात गायक अमित कुमारसह दोन मुले, एक मुलगी आहेत. रुमा गुहा यांनी दोन विवाह केले होते. चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांची पुतणी रुमा यांनी 60 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. 

कोलकता येथे 3 नोव्हेंबर 1934 रोजी जन्मलेल्या रुमा यांना नृत्यात विशेष रस होता. 1950 च्या दशकात त्या मुंबईला गेल्या आणि त्यांचा गायक किशोरकुमार यांच्याशी विवाह झाला. रुमा आणि किशोरकुमार हे 1958 मध्येच विभक्त झाले होते. त्यानंतर रुमा यांनी लेखक आणि दिग्दर्शक अरूप गुहा ठाकुरता यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले झाली, सोमोना आणि अयान गुहा ठाकुरता. मुंबईत अमितकुमार याच्याकडे तीन महिने राहून रुमा गुहा या नुकत्याच कोलकत्याला परतल्याचे अयान याने सांगितले.

रुमा यांच्या बहुतांश चित्रपटांची निर्मिती ही सत्यजित रे, तपन सिन्हा, तरुण मुजुमदार, राजन तरफदार, अर्पणा सेन आणि मीरा नायर यासारख्या दिग्दर्शकांनी केली. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रुमा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्‌विटरवर म्हटले की, चित्रपट आणि संगीत विश्‍वात रुमा यांचे योगदान अविस्मरणीय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Singer Ruma Guha Thakurta Passes Away at 84