छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने पतीसमोरच केली एक्स बॉयफ्रेंडची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जानेवारी 2020

छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने आपल्या पतीसमोरच एक्स बॉयफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली आहे. बहिणीच्या कोलाथुर येथील घरी तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या डोक्यात काठीने वार करून हत्या केली आहे. एस. देवी असे या अभिनेत्रीचे नाव असून, तिने स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला आहे. 

चेन्नई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने आपल्या पतीसमोरच एक्स बॉयफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली आहे. बहिणीच्या कोलाथुर येथील घरी तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या डोक्यात काठीने वार करून हत्या केली आहे. एस. देवी असे या अभिनेत्रीचे नाव असून, तिने स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एस. देवीला तिचा एक्स बॉयफ्रेंड पुन्हा सोबत राहण्यासाठी आग्रह करत होता. त्यातून अभिनेत्रीने टोकाचे पाऊल उचचले, असे पोलिसांनी म्हटले आहे. या गुन्ह्यात अभिनेत्रीचा पती बी. व्ही. शंकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आठ वर्षांपूर्वी एस. देवी आणि रवी हे रिलेशनशीपमध्ये होते. त्यावेळी एस. देवी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत होती असे पोलिसांनी सांगितले आहे.

Happy Birthday Sonali Bendre : सुरु होण्याआधीच संपली सोनालीची लव्हस्टोरी; 'या' व्यक्तीवर करायची प्रेम

दोन वर्षांपूर्वीच देवीच्या आणि रवीच्या नात्याबद्दल पती शंकर व त्यांच्या कुटुंबीयांना कळाले होते. ती माहिती मिळाल्यानंतर रवी आणि एस. देवीने लग्न करावे असे सल्ला तिला देण्यात आला. पण देवीने रवीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. 

चक्क, गुडघेदुखीला कंटाळून महिलेची आत्महत्या

देवीच्या पतीने तिला छोटा व्यवसाय सुरु करुन दिला. पण देवीशी संपर्क होत नसल्यामुळे रवीने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. रवी देवीचा शोध घेत तिची बहिण लक्ष्मीच्या घरी पोहोचला. लक्ष्मीने तातडीने देवी आणि तिच्या पतीला बोलावून घेतले. दरम्यान, देवी आणि रवी यांच्यामध्ये वाद झाला. रागाच्या भरात देवीने काठी आणि हातोड्यानं रवीच्या डोक्यात वार केला. यात त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर स्वत: देवीने राजामंगलम पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Beats Ex Boyfriend To Death In Tamil Nadu