Tesla Funding Row : 'लोकांच्या शहाणपणाचा विजय झाला'; क्लीन चिट मिळताच मस्कचे ट्वीट

ज्युरींचा हा निर्णय मस्कसाठी खूप महत्त्वाच असल्याचे बोलले जात आहे.
Elon Musk
Elon MuskSakal

Tesla Funding Row : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांच्या जुन्या ट्विटवरून निर्माण झालेल्या वादावर ज्युरींनी अखेर अंतिम निर्णय जाहीर केला आहे.

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

Elon Musk
Chinese Balloon : अमेरिकेनंतर आता लॅटिन अमेरिकेत दिसला चिनी स्पाय बलून; पेंटागॉनकडून निवेदन जारी

न्यायालयाच्या या निर्णयामुळे मस्कला मोठा दिलासा मिळाला असून, ट्विटद्वारे गुंतवणूकदारांना खोटी माहिती देण्यास मस्क जबाबदार नसल्याचे ज्युरींनी म्हटले आहे. टेस्लाला खासगी कंपनी बनवण्याच्या उद्देशाने मस्कने शेअर्स जारी केल्याचेही ज्युरींनी म्हटले आहे.

दरम्यान, ज्युरींचा हा निर्णय मस्कसाठी खूप महत्त्वाच असल्याचे बोलले जात असून, ज्युरींच्या या निकालानंतर मस्कने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

यामध्ये त्याने ज्युरींच्या निकालाचे कौतुक केले आहे. यामध्ये त्याने देवाचे आभार, लोकांच्या शहाणपणाचा विजय झाल्याचे म्हटले आहे.

ज्युरींच्या या निर्णयानंतर टेस्लाच्या शेअर्समध्ये 1.6 टक्क्यांनी वाढले आहेत.

Elon Musk
Viral Video : '...अन् इलॉन मस्क ढसाढसा रडला!' टेस्लाची इलेक्ट्रिक कार घेऊन 'ती' गेली पेट्रोल भरायला

गुंतवणूकदारांच्या वकिलाने व्यक्त केली निराजी

दरम्यान, ज्युरींच्या या निकालानंतर गुंतवणूकदारांचे वकील निकोलस पोरिट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्युरींच्या या निर्णयामुळे आम्ही निराश झाल्याचे तसेच पुढील पावलं उचलण्याच्या विचारात असल्याचे म्हटले आहे. २०१८ च्या ट्विटसाठी मस्कला जबाबदार धरले पाहिजे असे पोरिट यांनी म्हटले आहे.

Elon Musk
Twitter: मस्क आल्यापासून ट्विटरला लागलं ग्रहण, 20 कोटी यूजर्सचा डेटा लीक; तुमचे अकाउंट असेल तर सावधान

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण ऑगस्ट २०१८ चे असून, यामध्ये मस्कने ट्विट केले होते. टेस्लाला खाजगी कंपनी बनवण्यासाठी पुरेसे पैसे असल्याचे नमुद केले होते.

मस्कच्या भूमिकेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. मस्क यांच्या या ट्वीटनंतर अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाल्याचा दावा अनेक गुंतवणुकदारांनी करत कोट्यवधींच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com