Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

SEBI dismisses Hindenburg allegations against Adani Group : सेबीच्या निर्णयानंतर, गौतम अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रतिक्रिया दिली आहे.
SEBI clears Adani Group of Hindenburg allegations, giving a major relief to the conglomerate and boosting investor confidence.

SEBI clears Adani Group of Hindenburg allegations, giving a major relief to the conglomerate and boosting investor confidence.

esakal

Updated on

SEBI’s Verdict on Hindenburg Allegations: अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुप आणि त्यांचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्याविरुद्ध लावलेले आरोप भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड अर्थात ‘SEBI’ने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्गने असा दावा केला होता की अदानी ग्रुपने अ‍ॅडिकॉर्प एंटरप्रायझेस, माइलस्टोन ट्रेडलिंक आणि राहवर इन्फ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्यांद्वारे निधीचा गैरवापर केला आहे. 

याप्रकरणी आता दोन वेगवेगळ्या आदेशांमध्ये ‘सेबी’ने म्हटले आहे की, हे व्यवहार कोणत्याही उल्लंघनापासून मुक्त होते. त्यावेळी,अशा व्यवहारांना संबंधित पक्ष व्यवहार मानले जात नव्हते. नंतर नियम बदलण्यात आले. शिवाय, सर्व कर्जे परतफेड करण्यात आली आहेत, निधी कायदेशीर हेतूंसाठी वापरण्यात आला होता आणि कोणतीही फसवणूक किंवा अनुचित व्यापार पद्धती आढळल्या नाहीत. म्हणून, अदानी ग्रुपविरुद्धच्या सर्व कार्यवाही बंद करण्यात आल्या आहेत.

तर सेबीच्या निर्णयानंतर, गौतम अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया दिली आहे, "सेबीच्या चौकशीतून हे सिद्ध झाले की हिंडेनबर्गचे दावे पूर्णपणे निराधार होते. अदानी ग्रुप त्याच्या पारदर्शकता आणि सचोटीसाठी ओळखला जातो." असं त्यांनी म्हटलंय

SEBI clears Adani Group of Hindenburg allegations, giving a major relief to the conglomerate and boosting investor confidence.
Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

तसेच, या बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या अहवालामुळे पैसे गमावलेल्या गुंतवणूकदारांसाठी आम्हाला दुःख आहे. खोटेपणा पसरवणाऱ्यांनी देशाची माफी मागावी. भारताच्या संस्था, लोक आणि राष्ट्र उभारणीप्रती आमची वचनबद्धता अढळ आहे. सत्यमेव जयते! जय हिंद! असंही अदानी यांनी म्हटलंय.

SEBI clears Adani Group of Hindenburg allegations, giving a major relief to the conglomerate and boosting investor confidence.
US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

याशिवाय गौतम अदानी यांनी यापूर्वी म्हटले होते की, हिंडेनबर्ग अहवाल हा केवळ शॉर्ट-सेलिंग हल्ला नव्हता, तर त्यांच्या आर्थिक स्थिरतेला आणि विश्वासार्हतेला दुहेरी धक्का होता. हा हल्ला अशा वेळी झाला होता, जेव्हा समूहाचा फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग बंद होणार होता. अदानी यांनी याला जाणीवपूर्वक केलेला कट देखील म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com