esakal | गुजरातमध्ये हजारो कोटींच्या हेरॉईन जप्तीनंतर 'अदानी' समुहाचा मोठा निर्णय!
sakal

बोलून बातमी शोधा

adani group

गुजरातमध्ये हेरॉईन जप्तीनंतर 'अदानी' समुहाचा मोठा निर्णय!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन ड्रग्ज (heroin seized gujarat) सापडल्यानंतर अदानी समुहाने (adani group) मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समुहाने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. याची अंमलबजावणी 15 नोव्हेंबरपासून होणार आहे.

अदानी समुहाने घेतला मोठा निर्णय

गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर 16 सप्टेंबर रोजी अंदाजे 3 हजार किलो वजनाचे हेरॉईन (ड्रग्ज) जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 20 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. तालिबान आणि आयएसआयशी या प्रकरणाचा संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

अदानी समुहाने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. “15 नोव्हेंबरपासून अदानींच्या बंदरांवर यापुढे इराण (Iran), अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) मालवाहू जहाजांना अदानी नियंत्रित बंदरांवर (APSEZ port) प्रवेशबंदी असेल.” हा नियम अदानी समुहाकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व बंदरांना लागू असेल. पुढील नोटीस येईपर्यंत या तीन देशांमधून येणाऱ्या जहाजांना अदानी पोर्टवर बंदी असेल.

हेही वाचा: कोरोना लसीचा मिळणार तिसरा डोस? WHO ने केले स्पष्ट...

...त्या चर्चांना पूर्णविराम मिळेल, अशी आशा

अदानी ग्रुपविरोधातील सोशल मीडियावर सुरु असलेल्या खोट्या आणि बदनामीकारक चर्चांना पूर्णविराम मिळेल, अशी आशा आम्ही व्यक्त करतो. आमच्या कुठल्याही पोर्टवर उतरणाऱ्या कार्गोची तपासणी करण्याचे आमचे धोरण नाही, असंही अदानी ग्रुपने स्पष्ट केले होते. 16 सप्टेंबर रोजी डीआरआय आणि कस्टम्स विभागाने अफगाणिस्तानातून आलेल्या दोन कंटेनरमधून मुंद्रा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलवर (एमआयसीटी) मोठ्या प्रमाणावर हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला. अवैध अंमली पदार्थांचा साठा आणि आरोपींची धरपकड केल्याप्रकरणी आम्ही डीआरआयचे अभिनंदन करतो. डीआरआय आणि कस्टम्स विभागाला सरकारने बेकायदेशीर कार्गो उघडून तपासणी करण्याचे अधिकारी दिले आहेत. मात्र देशभरातील कुठलाही पोर्ट ऑपरेटर कंटेनरची तपासणी करु शकत नाही, असं अदानी समुहातर्फे स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा: भारताच्या अवकाशात लवकरच राकेश झुनझुनवालांचा ‘अकासा एअर’!

loading image
go to top