esakal | आता कोरोना लसीचा मिळणार तिसरा डोस? WHO ने केले स्पष्ट...
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

कोरोना लसीचा मिळणार तिसरा डोस? WHO ने केले स्पष्ट...

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाविरोधात (coronavirus) लढण्यासाठी विविध लशी (vaccine) निर्माण करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दोन डोस नंतर आता तुम्हाला कोरोना लसीचा तिसरा (corona third dose vaccination) डोस देखील दिला जाऊ शकतो. यावर आता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शिफारस केली आहे. नेमकी काय शिफारस केली आहे?

कोविड लसीचा तिसरा डोस मिळणार?

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शिफारस केली आहे की, कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना कोविड -19 लसीचा तिसरा डोस द्यावा. तथापि, डब्ल्यूएचओने सामान्य आरोग्य असलेल्या लोकांना किमान या वर्षाच्या अखेरीस बूस्टर डोस देण्यावर विचार करण्यात येणार आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना कोणत्याही मान्यताप्राप्त कोविड लसीचा तिसरा डोस दिला जाऊ शकतो.

यूएन हेल्थ एजन्सीच्या तज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ज्यांनी सिनोव्हाक आणि सिनोफार्म लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना तिसऱ्या लसीचा डोस दिला जाऊ शकतो. अमेरिका, यूएई, इस्रायल सारख्या काही देशांमध्ये याचा अवलंब केला जात आहे. यावर WHO च्या लसीकरण सल्लागार समितीनी स्पष्ट केले आहे की, ते प्रत्येकांसाठी कोविड लसीच्या बूस्टर डोसची शिफारस करत नाहीत. संस्थेने म्हटले की, संपूर्ण जगातील प्रत्येक व्यक्तीला कमीतकमी एक लसीचा डोस मिळाला पाहिजे, तरच प्रत्येकजण बूस्टर डोसचा विचार करू शकतो. डब्ल्यूएचओ ने प्रत्येक देशाच्या 10 टक्के लोकसंख्येचे सप्टेंबर पर्यंत लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु यातून केवळ 56 टक्केच लक्ष्य साध्य झाले आहे. 90 टक्के श्रीमंत देशांनी हे लक्ष्य गाठले आहे.

हेही वाचा: भारताच्या अवकाशात लवकरच राकेश झुनझुनवालांचा ‘अकासा एअर’!

काही देशांमध्ये लोकांना अजूनही लस नाहीच

विशेष म्हणजे, जगातील श्रीमंत देशांमध्ये 60-70 टक्के लोकांना किमान एक कोरोना लशीचा डोस मिळाला आहे. भारतातही कोरोना लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या जवळपास पोहोचणार आहे. परंतु काही देशांमध्ये, 5 टक्के लोकसंख्येला अजूनही लस दिलेली नाही. यामुळे कोरोनाचे संपूर्ण नष्ट करण्याच्या ध्येयाविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी जी २० परिषदेला संबोधणार, अफगाणिस्तान केंद्रस्थानी

loading image
go to top