esakal | भारताच्या अवकाशात लवकरच राकेश झुनझुनवालांचा ‘अकासा एअर’! विमान उड्डाणासाठी मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

akasa air

भारताच्या अवकाशात लवकरच राकेश झुनझुनवालांचा ‘अकासा एअर’!

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली : अब्जाधीश राकेश झुनझुनवाला (rakesh jhunjhunwala) यांच्या ‘अकासा एअर’ (akasa air) या कंपनीला हवाई वाहतूक मंत्रालयाकडून विमान उड्डाणासाठी प्राथमिक स्तरावरील मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पुढील वर्षीपासून या कंपनीची विमानसेवा भारतात सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कमी दरांत विमान प्रवासाची सुविधा

अत्यंत कमी दरांत विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा दावा आहे. ‘एसएनव्ही’ एव्हिएशन’ ही कंपनी ‘अकासा एअर’ या नावाने ही सुविधा पुरविणार आहे. आगामी चाचण्यांसाठी आवश्‍यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाला सहकार्य करू, असे ‘अकासा एअर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी सांगितले. दुबे हे जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. झुनझुनवाला यांनी ‘इंडिगो’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य घोष आणि विनय दुबे यांच्याबरोबर एकत्र येत विमान कंपनी निर्माण केली आहे.

70 विमाने खरेदी करणार

येत्या चार वर्षात राकेश झुनझुनवाला आपल्या या विमान कंपनीसाठी 70 विमाने खरेदी करणार आहेत. भारतीय लोकांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा यासाठी राकेश झुनझुनवाला विमान सेवा सुरु करणार असल्याचं सांगण्यात येतंय. "अकासा एअर" च्या ऑपरेशनसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले आहे. सोमवारी कंपनीच्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या होल्डिंग कंपनीने म्हटले आहे की, नवीन विमानसेवेचे लक्ष्य 2022 च्या उन्हाळ्यापर्यंत सुरू करण्याचे आहे. आकाश एअरला अनुभवी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांचे पाठबळ आहे

हेही वाचा: फ्री लशींमुळे पेट्रोल महागलं, पेट्रोलियम मंत्र्याचं स्पष्टीकरण

एव्हिएशन क्षेत्रात उतरण्याची तयारी

शेअर मार्केटमधील बिग बुल अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी आता एव्हिएशन क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे. भारतामध्ये येत्या काळात लो कॉस्ट विमानसेवा सुरु करण्यासाठी ते 3.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या चार वर्षात 70 विमाने खरेदी करण्याची योजना तयार केली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी 5 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यांच्या आणि मोदींच्या या भेटीची माध्यमांत आणि सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होत.

हेही वाचा: जम्मू काश्मीर : तीन दहशतवाद्यांचा खात्मा, पाच जवान हुतात्मा

राकेश झुनझुनवाला यांच्या विमान सेवा कंपनीचे नाव आकाश एयर (Akasa Air) असं असणार आहे. या नवीन एअरलाईन्समध्ये डेल्टा एयरलाईन्सचे माजी सीनियर एक्झिक्युटिव्ह आणि त्यांची टीम काम करणार आहे. एकाच वेळी 180 लोक विमानातून प्रवास करु शकतील अशा पद्धतीच्या विमानांची या कंपनीकडून चाचपणी होत आहे. भारताचे वॉरेन बफे अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्यासारख्या शेअर बाजारातील दिग्गजांच्या रणनितीवर सामान्य गुंतवणूकदारांची नजर असते. अनेक गुंतवणूकदार त्यांना फॉलो करतात. जगभरातील विमान सेवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बसला असून गेल्या दोन वर्षांपासून त्या बंद आहेत. अशा काळात राकेश झुनझुनवाला यांनी विमानसेवेमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

loading image
go to top