'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा

वृत्तसंस्था
रविवार, 20 जानेवारी 2019

पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणूनच जर काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणुक जाहीरनाम्यान राम मंदिराचा समावेश केला तर विश्व हिंदू परिषद काँग्रेसला जाहीर पाठींबा देईल असे सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणूनच जर काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणुक जाहीरनाम्यान राम मंदिराचा समावेश केला तर विश्व हिंदू परिषद काँग्रेसला जाहीर पाठींबा देईल असे सांगण्यात आले आहे.

विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमारा म्हणाले की, ''राम मंदिरासाठी ज्यांनी खुलेपणाने आश्वासन दिले आहे, त्यांना पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला तर आम्ही काँग्रेला पाठिंबा देण्याबाबतही विचार करू. त्यांनी आरएसएच्या स्वयंसेवकांच्या काँग्रेस प्रवेशावर घातलेली बंदी मागे घ्यावी. केवळ जानवे परिधान करून हे होणारे नाही, असे आव्हानही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना यावेळी दिले'' 

दरम्यान, विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलेले हे वक्तव्य भाजपासाठी धक्का आहे. तसेच राम मंदिर बांधण्याबाबत विश्व हिंदू परिषदेचा भाजपावर असलेला विश्वस उडत चालल्याचे या वक्तव्यामधून दिसत असल्याचे दिसत असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
 

Web Title: Add Ram mandir in your election manifesto then we will support you says VHP