
‘राष्ट्रपत्नी’च्या वक्तव्यावर अधीर रंजन चौधरींचे स्पष्टीकरण; मी बंगाली...
नवी दिल्ली : माझ्याकडून चूक झाली आहे. चुका माणसांकडूनच होतात. मी बंगाली आहे. हिंदी माझी मातृभाषा नाही. आमच्या हेतूत खोट नव्हता. कारण, त्या देशाच्या सर्वोच्च पदावर आहे. आज सभागृहातही आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली नाही. सत्ताधारी माझ्यावर आरोप करून सभागृहाचे कामकाज ठप्प केले, असे स्पष्टीकरण देताना अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) म्हणाले. चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्याने आज संसदेत प्रचंड गदारोळ झाला. (Adhir Ranjan Chaudhary Marathi News)
ते आरोप करतात हे ठीक आहे. पण, मलाही उत्तर देण्याचा अधिकार आहे. सभागृहात माझ्यावर एकतर्फी आरोप लावण्यात आले. मला बोलण्याची संधी द्यावी, अशी विनंती सभापतींना केली. सभापतींनी उत्तर देण्याची संधी दिली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बोलण्याची संधी दिली नाही. एका मंत्र्याने गोव्यात जे केले त्याचा बदला घेण्यासाठी माझ्याविरुद्ध हे सर्व सुरू केले आहे, असेही अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) म्हणाले.
हेही वाचा: Monsoon Session : राज्यसभेतून आणखी तीन खासदार निलंबित; २७ जणांवर कारवाई
चूक माणसाकडून होते. राष्ट्रपतींना (Draupadi Murmu) वाईट वाटत असेल तर मी जाऊन त्यांना भेटेन. मी त्यांना समजावून सांगेन. सर्वोच्च पदावर बसलेल्या कोणाचाही अपमान करणे ही भारताची परंपरा नाही. हे आपण शिकलो नाही. आयुष्यात कधीच करणार नाही. समजा माझी काही चूक झाली आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे. याची शिक्षा तुम्ही इतरांना देणार का? हे भाजपचे राजकारण आहे, असेही अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) म्हणाले.
जाणूनबुजून कोणाचाही अपमान केलेला नाही
मोदीजी (Narendra Modi) तुम्ही बंगालच्या मुख्यमंत्र्यांसाठी कोणती भाषा वापरली? आमचे नेते शशी थरूर यांच्या पत्नीला काय म्हणाले? भाजप तुम्हीही थोडी काळजी घ्या. माझ्याकडून चूक झाली. भाषेच्या उच्चारात चूक झाली आहे. मी हिंदी बोलत नाही, मी बंगाली आहे. मी जाणूनबुजून कोणाचाही अपमान केलेला नाही, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.
हेही वाचा: Don't Talk To Me; संसदेत स्मृती इराणींवर सोनिया गांधी संतापल्या
माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही
या लोकांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. कोण आहेत हे लोक, त्यांची माफी का मागायची? असे का झाले हे सांगण्यासाठी सभागृहात बोलण्याची संधी दिली पाहिजे. मला माझा मुद्दा नीट मांडता येत नसेल तर सभापती महोदयांनी त्यांना हवा तो निर्णय घ्यावा. ज्यांना भारतातील खऱ्या तहजीबची माहिती नाही, त्यांच्याशी काय बोलावे, त्यांच्याकडून काय शिकावे, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.
Web Title: Adhir Ranjan Chaudhary Draupadi Murmu Bengali Hindi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..