
Amir Khan Muttaki Statement
ESakal
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमुळे भारतात राजकीय गोंधळ उडाला आहे. महिला पत्रकारांना पत्रकार परिषदेत आमंत्रित करण्यात आले नव्हते. ज्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुत्ताकी यांनी "आम्ही महिलांना नकार दिला नाही" असे उत्तर देत भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध सुधारतील अशी आशा व्यक्त केली.