Afghanistan foreign minister clarifies why women journalists were not invited to press meet
Esakal
देश
महिला पत्रकारांना का बोलावलं नव्हतं? अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, तांत्रिक अडचण
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तक्की यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना बोलावण्यात आलं नव्हतं. तर रविवारच्या पत्रकार परिषदेला मात्र महिला पत्रकारांना निमंत्रण दिलं होतं.
भारत दौऱ्यावर असलेल्या अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर वाद निर्माण झाला होता. त्या पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला होता. मात्र त्यानंतर आज रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विशेषत: महिला पत्रकारांना निमंत्रण दिलं. पहिल्या पत्रकार परिषदेत महिलांना का बोलावलं नाही यावर अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तक्की यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी म्हटलं की, आमच्या सहकाऱ्यांनी मर्यादीत लोकांची यादी तयार करून निमंत्रण दिलं होतं. यामागे दुसरा काही उद्देश नव्हता. कमी वेळ शिल्लक असताना पत्रकारांना बोलावण्यात आलं होतं.