आफ्रिकेतील हिंसाचाराचा लहान मुलांना फटका

यूएनआय
बुधवार, 16 मे 2018

आफ्रिकेतील हिंसाचाराच्या घटनांचा सर्वाधिक फटका तेथील लहान मुलांना बसला आहे, असे युनिसेफचे म्हणणे आहे. आफ्रिकेतील हिंसाचाराच्या घटनांमुळे सुमारे साडेतीन लाख लहान मुले आरोग्य आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असून, त्यांचे शिक्षणही थांबले असल्याचा दावा युनिसेफकडून करण्यात आला आहे.
 

न्यूयॉर्क - आफ्रिकेतील हिंसाचाराच्या घटनांचा सर्वाधिक फटका तेथील लहान मुलांना बसला आहे, असे युनिसेफचे म्हणणे आहे. आफ्रिकेतील हिंसाचाराच्या घटनांमुळे सुमारे साडेतीन लाख लहान मुले आरोग्य आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असून, त्यांचे शिक्षणही थांबले असल्याचा दावा युनिसेफकडून करण्यात आला आहे.

आफ्रिकेतील हिंसाचारामुळे तेथील सुरक्षा आणि मानवाधिकारांची स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली असून, त्याचा मोठा परिणाम लहान मुलांवर झाला आहे. आफ्रिकेत मागील वर्षी सुमारे सहा लाख 87 हजार नागरिकांना स्थलांतर करावे लागणार असून, त्यात तीन लाख 57 हजार लहान मुलांचा समावेश आहे. चालू वर्षी आत्तापर्यंत 55 हजार नागरिकांचे स्थलांतर झाले असून, त्यात 28 हजार लहान मुले आहेत.

Web Title: In Africa, small children are problems in violence