Shraddha Murder Case : क्रूरकर्मा आफताबचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज; उद्या होणार सुनावणी

श्रद्धाच्या हत्येची कबुली देत त्याने तिच्या खुनाबद्दल भयंकर खुलासे केले आहेत.
Aaftab Poonawala
Aaftab PoonawalaSakal

श्रद्धा वालकर खून प्रकरणामुळे सगळा देश हादरला आहे. यातला मुख्य आरोपी आफताब पुनावाला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीनासाठी अर्ज केला आहे.

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आफताबने दिल्लीच्या साकेत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, आफताबने नार्को आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये आपला गुन्हा कबूल केला आहे.

Aaftab Poonawala
Shraddha Walker Murder Case : आफताबचा फास आवळला! जंगलात सापडलेली हाडं...

श्रद्धाच्या खुनाविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतलं आणि त्याची नार्को तसंच पॉलिग्राफ टेस्ट केली. यामध्ये त्याने खुनाची कबुली दिली आहे. तसंच श्रद्धाचे तुकडे त्याने ज्या ठिकाणी टाकले होते, तिथे काही हाडे सापडली आहेत. ही हाडे श्रद्धाचीच असल्याचं काल फॉरेन्सिकच्या तपासणीत सिद्ध झालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com