ऐकलं का? तरुणाला पळवून नेऊन जबरदस्तीने लावले लग्न!

Marriage
Marriage

पाटणा : मुलाला पळवून नेऊन बळजबरीने त्याचा लावलेला विवाह बेकायदा असल्याचे मत पाटण्याच्या कुटुंब न्यायालयाने व्यक्त केले आहे. या संदर्भातील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. पाटणा जिल्ह्यातील पंडारक विभागातील हे प्रकरण आहे. 

बोकारो पोलाद कारखान्यात सहायक व्यवस्थापकपदावर असलेल्या विनोद कुमार याचा तीन डिसेंबर 2017 रोजी पंडारक येथे एका मुलीबरोबर 'पकडुआ' विवाह लावला गेला. तो मूळचा पाटणा जिल्ह्यातील खुसरूपूरचा रहिवासी आहे. विवाहाच्या वेळी त्याच्याबरोबर वाईट वर्तणूक करण्यात आली, तसेच शस्त्रांचा धाक दाखवून त्याचा विवाह लावण्यात आला.

या संदर्भात विनोद कुमारने पोलिसांकडे तक्रार केली; पण त्यांनी काहीच केले नाही. त्यानंतर विनोद कुमारने या विवाहाला कुटुंब न्यायालयात आव्हान दिले. त्याच्या सुनावणीदरम्यान हा विवाह बेकायदा असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.

शस्त्राच्या धाकाने पळवून नेऊन विवाह लावण्यात आल्याची विनोद कुमारची तक्रार असून, मुलीच्या घरची माणसे तसेच तिच्या नातलगांवरही त्याने आरोप केले आहेत. बंदुकीच्या धाकाने मुलाला पळवून नेऊन त्याचा बळजबरीने विवाह लावण्याच्या घटना बिहारमध्ये घडत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com