...त्यावेळी अयोध्येत हिंदूनीच केले होते मुस्लिमांचे रक्षण

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

बाबरी मशीद पतनाच्या घटनेला 26 वर्ष पूर्ण झाली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली होती. या घटनेनंतर देशातील अनेक भागांमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. अयोध्येतही अशीच परिस्थीती होती, पण या परिस्थितीतही अयोध्येतील हिंदूनी माणूसकीचा धर्म पाळत त्यावेळी अयोध्येत आपला जीव धोक्यात घालून आपल्या मुस्लिम शेजाऱ्यांचे रक्षण केले होते. असे एका इंग्रजी माध्यमाने वृत्त दिले आहे.

लखनौ- बाबरी मशीद पतनाच्या घटनेला 26 वर्ष पूर्ण झाली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली होती. या घटनेनंतर देशातील अनेक भागांमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. अयोध्येतही अशीच परिस्थीती होती, पण या परिस्थितीतही अयोध्येतील हिंदूनी माणूसकीचा धर्म पाळत त्यावेळी अयोध्येत आपला जीव धोक्यात घालून आपल्या मुस्लिम शेजाऱ्यांचे रक्षण केले होते. असे एका इंग्रजी माध्यमाने वृत्त दिले आहे.

अयोध्येमधील नागरिकांच्या मनात आजही त्या आठवणी ताज्या आहेत. हिंदू समाजातील ज्येष्ठांनी हिंसक झालेल्या कारसेवकांना थारा दिला नव्हता. अनेक मंदिरातील पूजाऱ्यांनी भेदरलेल्या मुस्लिमांना मंदिरात आश्रय दिला होता. रायगंजमधील गोदीआना भागात मुस्लिमांची 50 ते 60 घरे होती. त्यानुसार जमाव मुस्लिमांच्या घरावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आला होता. मुस्लिम कुठे राहतात म्हणून ते विचारत होते त्यावेळी परिसरातील ज्येष्ठ मंडळी यांनी त्यांना रोखले होते. आमचे मुस्लिमांबरोबर अनेक पिढयांपासूनचे संबंध आहेत. तुम्हाला इथे हिंसाचार करु देणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. जमावाच्या धमकीचा त्या ज्येष्ठांवर कुठलाही परिणाम झाला नाही.

अयोध्या मुस्लिम वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष सादीक अली यांनी हनुमानगडी मंदिराच्या महंत आणि साधूंनी मुस्लिमांचा कसा बचाव केला त्याची आठवण सांगितली. अनेक मुस्लिमांनी त्यावेळी मंदिरात आश्रय घेतला होता. अयोध्येत शांतता प्रस्थापित होईपर्यंत महंतांनी त्यांचे रक्षण केले होते अशी आठवण सादीक अली यांनी सांगितली.

Web Title: After Babri Demolish Ayodhya Residents Priests Saved Muslims