BJP Politics: भाजपला कर्नाटकच्या जनतेचा जोर का झटका! महाराष्ट्र हातातून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू

BJP Politics in Maharashtra: भाजपच्या हातून दक्षिण भारत पूर्णत: निसटला असला तरी दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते
Narendra Modi-Amit Shah
Narendra Modi-Amit Shahesakal

BJP Maharashtra Politics: कर्नाटकमधील भाजपच्या पराभवाला विविध कारणे असली तरी गुजरात आणि कर्नाटकचे मैदान वेगळे असल्याचे पुन्हा एकदा जनतेने दाखवून दिले आहे.

भाजपच्या हातून दक्षिण भारत पूर्णत: निसटला असला तरी दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. ते सध्या भाजप आणि शिवसेना युतीकडे असून येथील सत्ता कायम राहण्यासाठी कर्नाटकच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आत्मचिंतन सुरू झाले आहे.

कर्नाटकच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा अंदाज आता सर्वपक्षीयांकडून बांधला जात आहे. भाजपने प्रदेशस्तरावर आत्मचिंतनपर बैठकांचे सत्र सुरू केले आहे. २०१८ च्या निवडणुकीत भाजपकडे २१ तर काँग्रेसकडे चार राज्य होती.

२०२३ मध्ये भाजपने सहा राज्ये गमाविली आहे. त्यामुळे कर्नाटकची निवडणूक ही मिशन २०२४ साठीची फायनल मॅच ठरेल इतकी चुरस भाजप आणि काँग्रसमध्ये पाहायला मिळाली. या निकालाची उत्सुकता संपूर्ण देशाला होती. निकालानंतर जनतेने काँग्रेसला भरभरून पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

Narendra Modi-Amit Shah
Uddhav Thackrey: उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी फेरनियुक्ती होणार! ठाकरे गटाने सुरू केली मोर्चेबांधणी

२०१८ मध्ये भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांमधील कमजोरीला आपली ताकद बनवित कर्नाटकात फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता मिळविली होती. यापूर्वी भाजप आणि जेडीएस यांची सत्ता कर्नाटकात होती.

आजपर्यंत कर्नाटकात काँग्रेसला एकहाती सत्ता बसेल, असा आकडा गाठता आला नव्हता. मात्र २०२३ च्या निवडणुकीत काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला.

देशभर मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या काँग्रेसला या विजयाने १२ हत्तीचे बळ मिळाले आहे. तर २०१४ नंतर काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी निघालेल्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने जोर का झटका दिला आहे.

निवडणूक कोणत्याही राज्याची असो तिथे प्रत्येक पक्ष साम, दाम, दंड, भेद वापरून आपली सर्व ताकद पणाला लावत असतो.

सामाजिक, जातीय आणि आर्थिक समीकरणांची गोळाबेरीज करून उमेदवार ठरवले जातत. तरीही कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव झाला. मतांची टक्केवारी घसरली. मागच्या तुलनेत आमदारांची संख्या साधारण २५ ने कमी झाली.

त्यामुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला हा अपयश जिव्हारी लागला आहे. या पराभवाला अनेक कारणे आहेत, मात्र प्रामुख्याने जाणवले ते गुजरात पॅटर्नचा अंमल, सक्षम नेतृत्वाचा अभाव, जनमतातील नेतृत्वाला नाकारणे, पक्षांतर्गत गटबाजीला लगाम घालण्यात यशस्वी झालेले काँग्रेस ही मुख्य कारण आहेत.

Narendra Modi-Amit Shah
Sharad Pawar: आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत हालचाली सुरू; शरद पवारांनी दिले 'हे' आदेश

आता सर्वच पक्षांना महाराष्ट्राच्या निवडणुकीचे वेध लागले असले तरी कर्नाटकच्या निकालावरून महाराष्ट्राच्या राजकारणाचे आत्मचिंतन सुरू झाले आहे.

मात्र कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालामध्ये तेथील जनतेने कॉंग्रेेसला दिलेला विजयचा निकाल कार्यकर्त्यांना उभारी देणारा ठरला असल्याचे राजकीय जानकारांचे म्हणने आहे.

भारत जोडो यात्रेने जुळविली मने

कर्नाटकच्या विजयामागे काँग्रेसच्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. भारत जोडो यात्रेत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांची मने जुळविली गेली.

पक्षांतर्गत असलेले मतभेद दूर करण्यासाठी या यात्रेचा पुरेपूर उपयोग झाला. पक्षासह नेत्यांच्या भविष्यासाठी जुन्या नेत्यांनी एकत्रित जनतेसमोर जाण्याची गरज असल्याचा सल्लाच या निवडणुकीत उपयोगी पडल्याचे प्रखरतेने दिसून आले. दुसरीकडे जुन्या-नव्यांचा मेळ घालण्याकडे भाजपने दुर्लक्ष केले.

जिल्ह्यातील नेत्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास

सत्ता नाही आली तरी चालेल मात्र पक्षाला उपद्रवी ठरणारे, अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला बदनाम करणाऱ्या नेत्यांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी पक्षनेतृत्वाने तयारी केली होती. त्यासाठी प्रदेश स्तरावरून तीन वेळा महाराष्ट्रातील भाजप मतदारसंघाचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले. ते रिपोर्ट कार्ड म्हणजे प्रत्येक आमदारांसाठी आरसाच होता.

दरम्यान, रिपोर्ट कार्डनुसार जिल्ह्यातील दोन्ही देशमुखांचा पत्ता कट होणार, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच पर्यायी चेहरा म्हणून जिल्ह्यातील अनेकांना पक्षात प्रवेश दिल्याने बदलाचे राजकीय वारेही वाहू लागले होते.

मात्र कर्नाटकाच्या निकालाने महाराष्ट्रातील चक्रीवादळ रोखण्यासाठी भाजप आता नियमांत बदल करणार असल्याने जुन्या नेत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

जुन्या मातब्बरांचा पत्ता कट करणे भोवले

मी म्हणजेच पक्ष अशा आविर्भावात वावरणारी नेतेमंडळी पक्षात आहेत. ही मंडळी पक्षालाही जड होतात. अशावेळी उमेदवारांची उलथा-पालथ करणे आवश्यक असते. असा पॅटर्न भाजपने सर्वप्रथम गुजरातमध्ये अमलात आणला. तेथे तो पॅटर्नही यशस्वी झाला.

भाजपने कर्नाटकात २२४ जागांवर उमेदवार देताना सुमारे ३५ जुन्या मातब्बर नेत्यांचे पत्ते कट केले. मात्र, गुजरात पॅटर्न कर्नाटकमध्ये भाजपच्या अंगाशी आला आणि पक्षाला पराभव स्वीकारावा लागला.

Narendra Modi-Amit Shah
Trimbakeshwar Controversy: त्र्यंबकेश्वरच्या वादात आता आखाड्याची उडी, घेतला मोठा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com