
साधारणत: आठ ते दहा तास काम करण्याचं कल्चर सगळीकडे आहे. यापेक्षा जास्त वेळ ज्यांना काम करावं लागतं त्याचा वैताग तुम्हीही कधी तरी अनुभवला असेलच. प्रिस्टिन केअरचे को फाऊंडर हरसिमरबीर यांनी 'इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू हॅकच्या' नावावर शेअर केलेल्या एका पोस्टनंतर सोशल मीडियावर वाद निर्माण झालाय. प्रिस्टिन केअर कंपनीमध्ये अप्लाय करणाऱ्या कँडिडेट्सला कसे शॉर्टलिस्ट केले जाते याची एक यादी शेअर त्यांनी करत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यावर आक्षेप घेत या पोस्टवर अनेकांच्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. (Pristyn Care Co-Founder Harsimarbir Singh Shared Interesting Interview hacks)
या विषयावरच्या वादाला खरी सुरूवात ही बाँबे कंपनीचे सीईओ शांतनु देशपांडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर झाली होती. फ्रेशर्सने १८ तास काम करायला हवं असा सल्ला ते मागल्या चार पाच वर्षापासून देत होते. त्यांच्या या वक्तव्याने जणू तरूणांचं रक्त तापलं होतं. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर राडा झालाय. यावर पुढे प्रतिक्रिया देत पटत नसल्यास सल्ला घ्यायचा नसता असे त्यांनी म्हटले होते. बाँबे शेव्हिंग कंपनीनंतर आता प्रिस्टिनच्या वक्तव्यावर राग व्यक्त होताना दिसतोय.
हरसिमरबीर यांनी सांगितलेल्या इंटरव्ह्यू हॅक्स फार वेगळ्या होत्या
१. सकाळी ८ वाजता मुलाखतीसाठी कॉल करत ते फ्रेशर सकाळी उठणारा आहे की उशीरा रात्रीपर्यंत काम करणारा आहे याचं परिक्षण करतात.
२. रात्रीचे ११ वाजता टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेत ते उशीरा रात्रीपर्यंत काम करू शकतात की नाही याचं परिक्षण करतात.
हरसिमरबीर पुढे म्हणतात, कंपनीमधील कामाच्या ६-८ तासांत कर्मचाऱ्यांचं धैर्य आणि त्याच्या काम करण्याची पद्धत जरी कळत असली तरी रात्रीचे ९ वाजता मुलाखत, रविवारी सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावणे या सगळ्यांमुळे कँडिडेटचे कामाप्रती डेडिकेशन कळतं.
मात्र त्यांची ही यादी सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांच्या यावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकाने आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यावर ही एक प्रकारची हरॅसमेंट असल्याचं म्हटलंय. तर एकाने जर कोणी तुम्हाला वर्किंग अवर्सनंतर कॉल करत असेल तर अशा कंपनीत कामच करू नये असेही म्हटले आहे. एकंदरीत Pristyn Care को-फाऊंडरने शेअर केलेल्या यादीनंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झालाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.