राहुल गांधींचे मोदींना खुले आव्हान

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी काल (बुधवार) स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर करत #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली तंदुरूस्त भारतासाठी मोहिम चालू केली. त्यानंतर ही मोहिम चालू ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेता हृतिक रोशन यांनीही अशाच प्रकारचा व्हिडिओ काढून तो ट्विट करण्याचे आव्हान दिले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते आव्हान स्वीकारल्याचे सांगितले. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना इंधनाचे दर कमी करण्याचे आव्हान टि्वटरवरून केले आहे. 

राहुल गांधींनी ट्विटरवर मोदींना आव्हान दिले, की ''तुम्ही विराट कोहलीने दिलेले तंदुरुस्तीचे आव्हान स्वीकारल्याबद्दल मी आनंदी आहे. त्यामुळे आता तुम्हाला माझ्याकडूनही एक आव्हान दिले जात आहे, की इंधनाचे वाढलेले दर कमी करा किंवा काँग्रेस देशव्यापी आंदोलन करेल आणि तुम्हाला याचे दर कमी करण्यास भाग पाडेल. त्यामुळे आता मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे''.

दरम्यान, विराटने आपल्या व्यायामाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. यातील विशेष बाब म्हणजे विराटचे हे आव्हान स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपला व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर करण्याचे कबूल केले आहे.

Web Title: After Challenges of Virat Kohli Rahul Gandhi Criticizes PM Narendra Modi