

Railway Employee Death Benefits
ESakal
भारतीय रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे कल्याण करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अविवाहित, विधवा किंवा घटस्फोटित मुलींना त्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतरही आरोग्य लाभ आणि प्रवास पास मिळू शकतील. या निर्णयामुळे पेन्शन किंवा इतर सरकारी लाभांवर अवलंबून असलेल्या हजारो आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना दिलासा मिळेल.