

दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक
esakal
Delhi Bomb Blast : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी शहरातील सर्व महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक, विमानतळ, मॉल्स, धार्मिक स्थळे आणि प्रमुख चौकांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू आहे. पुणे पोलिसांकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.