राज्यात तीन राजधान्या होणार? मुख्यमंत्र्यांचे कामाला लागण्याचे आदेश

वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

हैद्राबाद : आंध्र प्रदेशात तीन भविष्यात तीन राजधान्या असू शकतात, विकास कामांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिल्या आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी जाहीरनाम्यात केलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षण, सिंचन आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विभागानुसार राज्याची राजधानी करण्यात येणार असल्याचे संकेत आज (ता.१७) दिले.

दिल्लीतील धग कायम; जामियानंतर सीलमपूर पेटले

राज्याच्या विशाखापट्टणम, अमरावती, कुरनूल या तीन राजधान्या असू शकतात असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. प्रस्तावित विविध बाबींचा अभ्यास करण्यासाठी नगररचना तज्ज्ञांची असलेली समिती काही दिवसांत अहवाल पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांच्या मृत्यूचे प्रमाण घटले; खून होण्याच्या प्रमाणात मात्र वाढ

मुख्यमंत्री म्हणाले, 'तीन राजधान्या करण्याचा विचार आपण करत असून, प्रस्तावित अमरावती शहरातून विधिमंडळाचे कामकाज चालेल तर, दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच कुरनूल येथून न्यायालयीन प्रक्रिया चालेल. तर, तिसरी राजधानी विशाखापट्टणम येथून प्रशासकीय खात्याचा कारभार चालेल'. यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, यापूर्वीही जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या २५ सदस्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्री असण्याची देशातील ही पहिलीच वेळ होती. त्याचप्रमाणे राज्याला तीन राजधान्या असण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, अल्पसंख्य आणि कापू समाजातील प्रत्येकी एका सदस्याची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळामध्ये दुर्बल घटकांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Jagans 5 Deputy CMs Andhra Pradesh May See Three Capitals