esakal | तेजस्वी यादव व चिराग पासवान येणार एकत्र? भेटीनंतर चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

तेजस्वी यादव व चिराग पासवान येणार एकत्र? भेटीनंतर चर्चा

तेजस्वी यादव व चिराग पासवान येणार एकत्र? भेटीनंतर चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) यांचे पुत्र तेजप्रताप व तेजस्वी यादव यांच्यातील वादाची चर्चा बिहारमध्ये असताना लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) खासदार चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘एलजेपी’चे दिवंगत अध्यक्ष रामविलास पासवान यांचे वर्षश्राद्ध रविवारी (ता. १२) आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी चिराग पासवान यांनी बुधवारी तेजस्वी यांची भेट घेतली. या दोन्ही युवा नेत्यांच्या भेटीने ते भविष्यात एकत्र येण्याचे भाकीत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करू लागले आहे. पण ही भेट कौटुंबिक असल्याचे व दोघांच्या वडिलांच्या संबंधांवर यात चर्चा झाल्याचे तेजस्वी व चिराग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तेजस्वी यादव म्हणाले का, विधानसभेच्या २०१०मधील निवडणुकीत प्रचारसभांचे नियोजन कसे करायचे याचे प्राथमिक धडे मी रामविलास पासवान यांच्याकडून गिरवले होते. ती निवडणूक त्यांनी व माझे वडील लालू प्रसाद यांनी एकत्रित लढविली होती, अशी आठवण तेजस्वी यादव यांनी यावेळी सांगितली. लालू प्रसाद यादव यांना उद्या दिल्लीत भेटणार असल्याचे चिराग यांनी सांगितले आहे. जर वडिलांची तब्येत ठिक असेल तर ते पाटण्याला वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे ते म्हणाले.

हेही वाचा: उत्तराखंडच्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांचा राजीनामा

‘आरजेडी’ आणि ‘एलजेपी’ या दोन्ही पक्षात सध्या कौंटुबिक वाद सुरू असताना या दोन युवा नेत्यांची भेट झाल्याने चिराग पासवान हे लालू प्रसाद यांच्या गटात सहभागी होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत विचारले असता, ‘आम्ही दोघांनी एकत्र यावे, अशी इच्छा लालू प्रसाद यादव यांनीच व्यक्त केल्याने, आता माझ्‍याकडे सांगायला वेगळे काहीही नाही,’ अशी मिश्‍कील टिपण्णी तेजस्वी यादव यांनी केली. त्यावेळी चिराग पासवान यांनीही स्मितहास्य केले.

हेही वाचा: कोरोनानं झालेल्या मृत्यूंसाठी SCनं नाकारली नुकसान भरपाई; म्हटलं...

पंतप्रधानांनाही निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबरच ‘एलजेपी’चे कट्टर विरोधक व बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार व लालू प्रसाद यादव यांनीही चिराग पासवान यांनी वडिलांच्या श्राद्ध कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

loading image
go to top