Nitish Kumar: नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार? ममतांनंतर बदलला काँग्रेसबाबतचा सूर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतूक करताना त्यांनी युपीए सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
cm nitish kumar announcement
cm nitish kumar announcementsakal

पटना : ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये आपण स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं काल जाहीर केलं. यामुळं इंडिया आघाडीला मोठा झटका बसला होता. त्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील इंडिया आघाडीला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसला त्यांनी युपीए सरकार आणि घराणेशाहीवरुन टार्गेट केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मात्र कौतुक केलं आहे. (After Mamata Banerjee Nitish Kumar targeted congress INDIA Bloc again on the backfoot)

cm nitish kumar announcement
Manoj Jarange: 'लोणावळा करार' निर्णायक ठरणार का? दोन सरकारी शिष्टमंडळं जरांगेंच्या भेटीला

बिहारमध्ये जदयूच्यावतीनं आयोजित एका रॅलीत संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसवर टीका केली. मोदी सरकारनं नुकतेच दिवंगत समाजवादी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांची निवड भारतरत्न पुरस्कारासाठी केली आहे.

यापार्श्वभूमीवर नितीश कुमार म्हणाले, "2005 मध्ये (बिहारमध्ये) सत्तेत आल्यापासून मी 2023 पर्यंत केंद्रातील सरकारांना या (भारतरत्न) साठी विनंती करत राहिलो. शेवटी, सध्याच्या (नरेंद्र मोदी) सरकारने माझी मागणी पूर्ण केली ज्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. सरकार आणि पंतप्रधान मोदी"

cm nitish kumar announcement
Ramdas Athawale:"नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार ? NDA मध्ये करणार कमबॅक' रामदास आठवलेंचा मोठा दावा

"मला रामनाथ ठाकूर (कर्पूरी यांचा मुलगा आणि खासदार) यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी त्यांना फोन केला. तथापि, त्यांनी (पंतप्रधान) मला फोन केला नाही. तरीही मी त्यांचे (पीएम) आभार व्यक्त करू इच्छितो, मी मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो, 'आम्ही काय केलं याची दखल न घेता तुम्ही श्रेय घेऊ शकता'

cm nitish kumar announcement
Manoj Jarange: 'लोणावळा करार' निर्णायक ठरणार का? दोन सरकारी शिष्टमंडळं जरांगेंच्या भेटीला

यावेळी घराणेशाहीच्या राजकारणावर नितीश म्हणाले, "आजकाल, बरेच लोक राजकारणात स्वतःच्या कुटुंबाचा प्रचार करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात. परंतू कर्पूरीजींनी त्यांच्या आयुष्यात कधीही असं केलं नाही" कर्पूरींकडून प्रेरणा घेऊन ते म्हणाले, "मी देखील माझ्या स्वतःच्या कुटुंबाचा प्रचार केला नाही. या विधानामुळं थेटपणे काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल यांना उद्देशून नितीश कुमार यांनी भाष्य केल्याचं बोललं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com