प्रकाश राज यांच्या कार्यक्रमानंतर भाजपने शिंपडले गोमूत्र...

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी संक्रांतीच्या दिवशी मठामधील व्यासपीठ गोमूत्र व तुळशीच्या पानाने शुद्ध केले. प्रकाश राज यांच्यामुळे मठाची पवित्र जागा अशुद्ध झाल्यामुळे गोमूत्र शिंपडण्यात आल्याचे भाजपच्या एका कार्यकर्त्याने सांगितले

बंगळूर - प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या कर्नाटकमधील एका कार्यक्रमानंतर व्यासपीठ "शुद्ध' करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी तेथे गोमूत्र शिंपडले.

सिरसी येथील राघवेंद्र मठामध्ये डाव्या विचारवंतांकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये राज यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी संक्रांतीच्या दिवशी मठामधील व्यासपीठ गोमूत्र व तुळशीच्या पानाने शुद्ध केले. प्रकाश राज यांच्यामुळे मठाची पवित्र जागा अशुद्ध झाल्यामुळे गोमूत्र शिंपडण्यात आल्याचे भाजपच्या एका कार्यकर्त्याने सांगितले. सर्व सिरसी शहर याच प्रकारे शुद्ध करुन घेण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचे कडवे टीकाकार असलेले प्रकाश राज यांनी या घटनेवर आश्‍चर्य व्यक्त केले आहे. मी जेथे जेथे जाईन, तेथे भाजपकडून असेच शुद्धीकरण केले जाईल का, अशी उपहासात्मक विचारणाही त्यांनी केली. कर्नाटकमध्ये यावर्षी निवडणूक होणार असल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे.

Web Title: After Prakash Raj Event, BJP Workers Sprinkle Cow Urine For 'Cleansing'