CAA विरोधात देशभरात उद्रेक; बिहारमध्ये बंद 

वृत्तसंस्था
Sunday, 22 December 2019

- सीएएला मोठा विरोध

- बिहार बंदची हाक.

नवी दिल्ली : नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याला देशभरातून विरोध केला जात आहे. याचा उद्रेक बिहारमध्येही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यातूनच 'बिहार बंद'ची हाक देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढला आहे. येथील डाक बंगला परिसरात आंदोलकांकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. कोतवाली भागात न्याय दंडाधिकाऱ्यांकडून याप्रकरणी 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आत्तापर्यंत 250 लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

CAA : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 'भीम आर्मी' प्रमुख अटकेत!

दरम्यान, बिहार बंदच्या कालावधीत दगडफेक आणि गोळीबारही झाला. यामध्ये दहा नागरिकांना गोळी लागली तर दोन डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

अनेक पोलिस जखमी

या आंदोलनादरम्यान अर्धा डझनहून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या गोळीबारात जखमी झालेल्या नागरिक, पोलिसांना पटना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील एकाची प्रकृती नाजूक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Protest against CAA Bihar Bandh