esakal | CAA : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 'भीम आर्मी' प्रमुख अटकेत!
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekar-Aazad-Bhim-Army

दर्यागंज भागातील हिंसाचारामध्ये 49 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 13 पोलिसांचा समावेश आहे.

CAA : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 'भीम आर्मी' प्रमुख अटकेत!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत देशभरात आंदोलने सुरू आहेत. शुक्रवारी (ता.20) राजधानी दिल्लीमधील हिंसाचारप्रकरणी काही नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'भीम आर्मी'चे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दर्यागंज भागात झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केले. परवानगी नसताना आझाद यांच्या संघटनेने जामा मशीद ते जंतरमंतर दरम्यान मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस घटनास्थळी गेले होते. मात्र, पोलिसांना गुंगारा देत आझाद मशिदीमध्ये शिरले होते. त्यानंतर शनिवारी (ता.21) सकाळी मशिदीबाहेर येताच त्यांना अटक करण्यात आली आहे. 

- 'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय!

काल झालेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आणि पोलिसांना गुंगारा दिल्याबद्दल आझाद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, लोकांना भडकावणे आणि दंगल घडवून आणणे यांसारख्या वेगवेगळ्या कलमांतर्गत आझाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

- शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार

दिल्लीतील तीस हजारी कोर्टासमोर आझाद यांना सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. दर्यागंज परिसरात हिंसाचार प्रकरणी यापूर्वी 15 आंदोलकांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळाच्या आसपास असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने दंगल भडकावणाऱ्यांचा शोध घेत आहेत. तसेच यामध्ये सामील असलेल्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

- ...म्हणून भाजप घेणार आता 250 पत्रकार परिषदा!

दर्यागंज भागातील हिंसाचारामध्ये 49 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 13 पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर एकाचा पाय मोडला आहे. तीन गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.