esakal | 'उडता पंजाब'नंतर आता 'उडता बिहार'; दारूबंदीमुळे ड्रग्ज तस्करी सुसाट
sakal

बोलून बातमी शोधा

drugs

पंजाबनंतर आता बिहारही ड्रग्स तस्करीचे मोठे केंद्र बनताना दिसत आहे.

'उडता पंजाब'नंतर आता 'उडता बिहार'; दारूबंदीमुळे ड्रग्ज तस्करी सुसाट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- पंजाबनंतर आता बिहारही ड्रग्स तस्करीचे मोठे केंद्र बनताना दिसत आहे. नुकतेच नार्कोटीक्स कंट्रोल ब्लुरोने पाटणा जंक्शनवर 75 कोटी रुपयाच्या हेरॉईनसोबत मध्य प्रदेशातील एक ड्रग लॉर्ड किशन लालला पकडले. येथून हे हेरॉईन कोलकात्याला पाठवली जाणार होती. मालाची डिलेवरी गेटवे ऑफ नेपाल नावाच्या प्रसिद्ध मास्टरजीला होणार होती. पंजाबमध्ये कठोर पावलं उचलण्यात आल्याने आणि बिहारमध्ये दारुबंदी केल्याने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज स्मग्लरांनी बिहार, यूपी आणि दिल्लीला आपले लक्ष्य केले आहे. बिहार आणि यूपी ड्रग्ज तस्करांसाठी अगदी योग्य ठिकाण आहे, कारण या दोन्ही राज्यांची नेपाळसोबत सीमा लागून आहे. लोकसंख्येच्या बाबतीतही बिहार आणि यूपी मोठे राज्य आहेत. 

बिहारमध्ये पूर्वी अफूची शेती व्हायची. बिहारच्या पूर्णिया, अररिया आणि भागलपूर सारख्या जिल्ह्यामंध्ये ही शेती केली जात होती. बिहार पोलिसांनी त्यानंतर हजारो एकर शेती उद्धवस्त केली. पण, गेल्या काही वर्षांपासून बिहारमध्ये ड्रग्सची मागणी वाढली आहे.  

'टाटा'ची किफायती योजना; होम लोनचा दर फक्त 3.99 टक्के, 8 लाखांचे गिफ्ट...

कस्टम ब्युरोने गेल्या काही दिवसात 2,795 किलोची उच्च दर्जाची कोकीन जप्त केली होती. शिवाय 17 लोकांना अटक करण्यात आले आहे. 15 सप्टेंबर रोजी डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेंसला माहिती मिळाली होती की, नेपाळमार्गे मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगर आणली जात आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी खबरदारी घेत ही तस्करी रोखली. यावेळी 86 किलो म्हणजे 25 कोटीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली होती. 'नवभारत गोल्ड'ने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

ड्रग्ज लॉर्ड मालाची सप्लाय करताना मोठी काळजी घेत असतात. ठिकठिकाणी आपली मानसे पेरलेली असतात. प्रत्येकवेळी माल वाहतुकीचे पर्याय बदलले जातात. नेपाळमधून ड्रग्ज तस्करी वाढली आहे. नेपाळ आणि भारतामध्ये करारानुसार दुसऱ्या देशांच्या नेपाळमध्ये जाणाऱ्या गाड्यांची झडती भारतीय अधिकारी करु शकत नाही. दोन्ही देशातील हा करार ड्रग्ज तस्करांसाठी वरदान आहे. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या वन बॉर्डर वन आर्मी पॉलिसी अंतर्गत भारत-नेपाळ सीमेवर 2003-04 पासून एसएसबी तैनात करण्यात आली आहे. 

लशीमुळे कोरोना थांबणार नाही, आजार पसरणारच; ब्रिटिश शास्त्रज्ञाचा दावा

ड्रग्स तस्करांचे निश्चित असे कोणतेही ठिकाण नसते. त्यांची मुळे मुंबई, चैन्नई आणि कोलकात्ता सारख्या इहरांशी जोडले गेले आहे. कारण, या शहरांमध्ये बंदरे आहेत. बिहारमध्ये तरुण मुले ड्ग्जच्या आहारी जाताना दिसत आहेत. ड्रग्ज तस्करीची अर्थव्यवस्थेचा टर्नओव्हर करोडोमध्ये आहे. बिहारमध्ये गुप्त कोठारांमध्ये ड्रग्ज पुड्यांमध्ये ठेवले जाते. या पुड्यांचा शहरात सप्लाय केला जातो. यासाठी शहरातंमध्ये काही ठराविक ठिकाणे असतात. अनोळखी मानसाला माल दिला जात नाही. बिहारमध्ये अनेक ठिकाणी सिगरेट, तंबाखूसारखे ड्रग्ज विकले जाऊ लागले आहे. धार्मिक स्थळी आणि रेल्वे स्टेशनवरील भिकाऱ्यांचाही या कामासाठी वापर केला जात आहे. 

(edited by- kartik pujari)